दामत रेल्वे फाटक रस्त्याची दुरावस्था

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ गावाला वळसा घालून जाणाऱ्या पेशवाई रस्त्याच्या दामत रेल्वे फाटक परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर ते दामत या पेशवाई रस्त्यावर नेरळ विकास प्राधिकरणाकडून बनविण्यात आला आहे. दरम्यान, या रस्त्यावर नेरळ विकास प्राधिकरणाकडून या रस्त्यावर गणेशोत्सव पूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

पेशवाई रस्ता हा नेरळ गावात न येता बाहेरून वाहने घेऊन जाण्यासाठी वळसा घेणारा मार्ग समजला जातो. या रस्त्याची प्राधिकरणाकडून दहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यानंतर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दी मधील काही रस्त्याची काँक्रीटकरण पूर्ण केले आहे. मात्र या रस्त्याचा मोठा भाग हा आजही काँक्रीटकरण किंवा नव्याने डांबरीकरण करण्याच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असताना देखील शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. या रस्त्याच्या दुरुस्ती आणि नव्याने दुरुस्ती करण्यात याव्यात यासाठी उपोषण देखील झाले होते.

या रस्त्याच्या कोल्हारे ग्रामपंचायतीमधील भागापासून दामत रेल्वे फाटक या भागातील रत्स्यावर असलेले खड्डे यातून वाहनांना मार्ग काढायला कठीण जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती प्राधिकरणाकडून करण्यात यावी अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय हजारे यांनी केली आहे.

Exit mobile version