5 वर्षानंतर 60 लाखाचा आला निधी; निधी कमतरतेने विश्रामगृह राहणार अपूर्ण
। मुरूड जंजिरा। वार्ताहर ।
मुरूड शहराचा परिसर निसर्गरम्य असल्याने जगातून पर्यटक मुरुडला भेट देतात. नवाब काळापासून मुरूड शहराची रचना सुंदर आहे. सार्वजनिक बांधकाम, वनविभाग व जिल्हा परिषद असे तीन विश्रामगृह येथे आहेत. विश्रामगृह समुद्रकिनारी असल्याने इमारतीच्या पायरीला समुद्राचे पाणी स्पर्श करते म्हणूनच पर्यटक शासकीय अधिकारी व परदेशी पाहुणे या विश्रामगृहात राहायला मिळेल अशी वाट पाहतात. परंतु कोविड काळात विश्रामगृह आरोग्य विभागाला वर्ग केल्याने 5 वर्षात विश्रामगृहाची कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याने आज अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे.
प्रवेशद्वारावर काटेरी झाडांचे जंगल तयार झाले आहे. भिंतींवर झाडे उगवली आहेत. 4 वर्षापूर्वीच नूतनीकरण करून 2 वातानुकूलित कक्ष व 3 साधे कक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर मुरूडला झालेल्या वादळात पत्रे उडून गेल्याने नवीन कामाचे मोठे नुकसान झाले. नुकतेच आरोग्य विभागाने त्यांचे साहित्य नेल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने विश्रामगृह नूतनीकरणासाठी 2020 ला 80 लाखाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाला पाठवल्याची माहिती अभियंता माने यांनी दिली होती. 5 वर्षानंतर फक्त 60 लक्ष रूपयांचा निधी आल्याने इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. आतील फर्निचरसाठी पुन्हा निधी मागवणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम अधिकारी उमाजी राठोड यांनी दिली.
मुरूडसारख्या पर्यटन क्षेत्रात शासनाचे विश्रामगृह नूतनीकरणासाठी रायगडच्या पालकमंत्र्यांनी विशेष निधी देऊन नूतनीकरणाचे काम तातडीने सूर करावे अशी मागणी मुरूडकरांकडून होत आहे. 80 लाखाच्या प्रस्तावात परिसराची झाडी कापून स्वछता, इमारतीत भिजलेले फर्निचर बदलणे, वातानुकूलित कक्ष पीओपी करून अंतर्गत सुशोभीकरण करणे हि कामे होणार आहेत.
विश्रामगृहाच्या दुरवस्थेची कारणे
1 ) 2020 साली आलेले तुफानी वादळ वादळात पत्रे
उडाल्याने नवीनच केलेलं फर्निचर भिजले व खराब झाले.
2) पत्रे टाकून इमारत दुरुस्त केली. तोच कोरोना सुरु झाल्याने पुन्हा
कोविड कारणांसाठी इमारत तहसीदारांनी आरोग्यविभागाकडे
दिले.
3) कोरोना काळात 15 दिवस काही पेशन्ट राहिले असतील
नंतर इमारत पूर्ण रिकमीच राहिली कोव्हीडमुळे इमारतीत प्रवेश
नसल्याने इमारतीची दुर्दशा झाली.
4) कोव्हीड संपला पण अधिकारांच्या निरुत्सामुळे इमारतीती
कोव्हीड रुग्णाचे साहित्य हटवण्यात 2 वर्ष गेली त्यात इमारतीचे
मोठे नुकसान झाले. आज इमारतीत प्रवेश करणे कठीण आहे.
कक्ष वर्षभरत उधडलाच नाही.आत काय झाले असले देव जाणे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचा 60 लाख निधी आल्याने दुरुस्तीचे काम सुरु आहे. 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. आतील कामाचा नवीन प्रस्ताव देणार आहे.
– उमाजी राठोड, सार्वजनिक बांधकाम खाते अधिकारी