सावंतवाडी-मळेवाड मार्ग खड्डेमय

वाहनचालकांना प्रवासासाठी तारेवरची कसरत
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी-मळेवाड मार्गावरील न्हावेली ते निरवडे हा रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्याची चाळण झाली आहे. सावंतवाडीत जाणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून दर दिवशी असंख्य वाहनाची रहदारी असते. पण आता या मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरत, तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे.

गणेश चतुर्थीपूर्वी संबधित विभागाने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याची सध्याची परिस्थिती अशी आहे की रस्तावर खड्डा की खड्यात रस्ता आहे हे समजत नाही. हमरस्ता असून या रस्त्याची दशा पाहता खेडे गावांस जोडणारा कच्चा रस्ता असल्याचा आढळत आहे.
रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येऊन सुद्धा त्यावर कोणतीच उपाययोजना करण्यात येत असल्याचे आढळत नाही. या रस्त्याची डागडुजी करून तो वाहतुकीयोग्य करावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Exit mobile version