| सुतारवाडी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा आंबिवली येथील बादल जाधव यांना शिक्षक परिषद संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आ. संजय केळकर, शिक्षण परिषदेचे नेते राजेश सुर्वे, केंद्रप्रमुख उमेश महाडेश्वर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
बादल जाधव यांनी तिसे येते अकरा वर्षे सेवा केल्यानंतर ते आता रा.जि.प. शाळा आंबिवली, ता. रोहा येथे कार्यरत आहेत. गेल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे अनेक विद्यार्थी नवोदय, स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत. त्यांना गेल्या वर्षी आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्व शिक्षक मित्र, त्याचप्रमाणे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.