ऑलिंपिक धर्तीवरील बॅडमिंटन कोर्टचे उद्या लोकार्पण

| अलिबाग | प्रतिनिधी |

केवळ राजकारण न करता राजकारणाबरोबरच समाजकारण, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी करणाऱ्या शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांंच्या संकल्पनेतून आंबेपूर येथे साकारण्यात आलेल्या भव्यदिव्य अशा बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण गुरुवारी (दि.31) मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. यानिमित्ताने दिलेल्या वचनपूर्तीचा आनंद मला होत असून,या कोर्टमधून दर्जेदार बॅडमिंटनपटू तयार होतील, अशी अपेक्षा चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली आहे.


बाह्य खेळाबरोबरच अंतर्गत खेळातून खेळाडूंना जिल्हा, राज्य, देश पातळीवर खेळण्याची संधी मिळावी. तरुणाई खेळाकडे अधिक वळली पाहिजे हा उद्देश समोर समोर ठेवून चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने भव्यदिव्य असे बॅटमिंटन कोर्ट आंबेपुरमधील बांधणमध्ये उभारण्यात आले आहे. ऑलंपिकच्या धर्तीवर असणारे रायगड जिल्ह्यातील हे पहिले कोर्ट असून याचा खेळाडूंना चांगला फायदा होणार आहे.

अलिबाग तालुका पर्यटनाच्या दृष्टीने नावारुपाला येत असताना, कबड्डी खेळातूनही अलिबागचे नाव लौकिक होत आहे. सध्या बॅडमिंटन खेळाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अद्ययावत असे बॅडमिंटन कोर्टचा अभाव असल्याने खेळाडूंना व्यासपिठ मिळत नसल्याचे शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या लक्षात आले. खेळाडूंना हक्काचे व्यासपिठ मिळावे यासाठी त्यांनी आंबेपूरमधील बांधण परिसरात बॅडमिंटन कोर्ट उभारले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली आहे.

असे आहे कोर्ट
बांधण येथील जागेत दोन अद्ययावत असे सर्व सुविधा असे बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. 50 फूट लांब व 25 फूट रुंद अशा जागेत आंतरराष्ट्रीय धर्तीवर ऑलिंपिकच्या नियमानुसार बॅडमिंटन कोर्ट बांधले आहे. या कोर्टमध्ये दोन प्रशिक्षक नियमित असणार आहेत. त्याठिकाणी नियमित खेळाडूंना सराव करता येणार आहे. तसेच बॅडमिंट हौशींना देखील खेळण्याची संधी येथे मिळणार आहे.

या बॅडमिंटन कोर्टमध्ये भविष्यात तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा घेऊन येथून खेळाडूंना चांगली संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे. बांधणपासून वीस किलो मीटर परिघातील वडखळ, अलिबाग, नागोठणे या ठिकाणी अशा प्रकारचे क्रीडासंकूल नसल्याने त्याचा फायदा येथील खेळाडूंना होणार आहे.

चित्रलेखा पाटील, शेकाप नेत्या
Exit mobile version