वढाव येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

| हमरापूर | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वढाव येथील बालविकास विद्यामंदिर उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षीदेखील दप्तरचे वाटण्यात आली. या शाळेत वढावसह पंचक्रोशीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे वाटप केल्याचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version