| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना शनिवारी (दि.16) शांततेचा भंग होण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी कारवाईकनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये ‘लेहरा दो तिरंगा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार होते. या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर शनिवारी (दि.17) त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर करत शांतता राखण्याचा बाँड भरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार नाही. यावेळी दिपके यांच्यासह ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना देखील शनिवारी सकाळी ताब्यात घेण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोडण्यात आले. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका करत सर्व आंदोलकांची सुटका करण्याची मागणी केली होती.
अभिजीत दिपकेंना जामीन मंजुर
