नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या वर्षी उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थिनी असलेल्या नताशा नरवाल, देवांगना कालिता आणि जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आसिफ इकबाल यांना मंगळवारी जामीन मंजूर करण्यात करण्यात आला खरा,पण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या तिन्ही विद्याथ्ििनींना दिलेला जामीन रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाचे सुट्टीतील न्या.हेमंत गुप्ता आणि व्ही.रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द ठरविला आहे.या विद्यार्थिनींवर दहशतवादाचा गुन्हा का लावला गेला याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.त्यामुळे या तिन्ही आरोपींना असा जामीन देणे योग्य ठरणार नाही,असे न्यायालयाने नमुद केले आहे.