। पनवेल । प्रतिनिधी ।
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2020/2021 करिता महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 03सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन मुंबई या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पिठासीन अधिकारी यांच्या निर्देशानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधीमंडळाच्या माजी सदस्यांना 2018-2019, 2019-2020, 2020-2021, 2021-2022, 2022-2023 आणि 2023-2024 या कालावधीसाठी देण्यात येणार्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण याची घोषणा केली असून त्याचे वितरण सोहळा 03 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन मुंबई या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते होणार आहे.