बाळाराम पाटील यांच्या विजयाचा निर्धार

शिवसेनाभवनमध्ये बैठक
| उरण | वार्ताहर |
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे बाळाराम पाटील यांनाच पुन्हा निवडूण आणण्याचा निर्धार शिवसेना भवन येथे झालेल्या नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडी महत्त्वाची बैठक शिवसेनाभवन येथ पार पडली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, खा.विनायक राऊत, खा.राजन विचारे, महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री अभ्यंगकर,महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील, जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, काँग्रेस नेते आर. सी. घरत, उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील ,माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना महाविकास आघाडीची एकजूट दाखविण्याची संधी मिळणार आहे.बाळाराम पाटील यांनी गेल्या सहा वर्षात शिक्षकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडून सरकार दरबारी ते प्रश्‍न हिरीरीने मांडलेले आहेत.एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.यासाठी त्यानाच पुन्हा निवडूण देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बाळाराम यांचा विजय निश्‍चित
बाळाराम पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी बाळाराम पाटील यांनाच उमेदवारी देऊन शेकापवर विश्‍वास व्यक्त केला आहे.बाळाराम पाटील यांनीही शिक्षकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली आहे.त्यामुळे शिक्षक मतदारांमध्येही त्यांच्याविषयी आत्मियता असल्याचे दिसून येते,असेही जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version