| कोलाड | वार्ताहर |
गेली दहा-बारा दिवस पाऊस गायब झाला. यामुळे भातशेती करपू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दोन ते तीन दिवसात पाऊस पडला नाही तर भातपीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु शुक्रवार दि.23 ऑगस्ट पासून पावसाळा जोरदार सुरुवात झाली. भातशेतीला नवसंजीवनी मिळणार यामुळे शेतकरी राजा सुखावला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. या अंदाज खरा ठरत जुन महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यापासून चांगली सुरुवात झाली. ती पण न उघडकीस देता. यामुळे भात पेरणीची कामे ही वेळेवर सुरु झाली. जुन महिन्याच्या शेवट पर्यंत पावसाची रिपरिप सतत सुरु होती यामुळे भाताची रोपे ही उत्तम प्रकारे तयार झाली.
जुलै महिन्यात तर पावसाने अती जोरदार सुरुवात केली यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीला भात लावणीची सुरुवात झाली. पावसाची संततधार सतत सुरु राहिल्याने जुलै महिन्यात पंधरा ते विस दिवसात लावणी पूर्ण झाली. परंतु लावणी पूर्ण झाल्यानंतर अतिजोरदार पावसामुळे सर्व भातशेती तीन चार दिवस पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पणे पाण्याखाली गेली. काही भात शेती वाहून गेली असल्याचे दिसून आले.
यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने उकडकीस दिली.आणि भात शेतीला उभारी मिळाली परंतु 10 ऑगस्ट नंतर दहा ते बारा दिवस पावसाने पूर्णपणे उघाड दिली या दिवसात पाऊस पूर्ण बंद झाल्यामुळे शेतीतील पाणी पूर्णपणे निघून गेले व भातशेतीला भेगा पडला व भातशेती करपु लागली यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंता अधिक वाढू लागल्या नंतर काल शुक्रवार दि. 23 ऑगस्ट पासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली असल्यामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावला असल्याचे दिसून येत आहे.