| नागोठणे | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या श्री दत्त प्रसन्न मंडळ बाळसई यांच्यातर्फे यावर्षीसुद्धा मंगळवार दि.26 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता ज्योतिषशास्त्रज्ञ प्रविण मनोहर जोशी यांच्या मंत्रविधिने होमहवन करुन होणार आहे. तसेच सहा वाजता श्री दत्त जन्माचा उत्सव साजरा होईल. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण बाळसई गावातुन श्री. दत्त पादुकांची पालखीतुन भव्य मिरवणूक निघणार आहे. पालखी मिरवणूक झाल्यानंतर रात्री 8 वाजता श्री दत्त प्रसन्न मंडळ बाळसई यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी 9.30 वाजता विशाल यादव यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन श्री दत्त प्रसन्न मंडळ, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ बाळसई यांनी केले आहे.
बाळसईत रौप्य महोत्सवी दत्तजयंती उत्सव
