बळवंत वालेकर यांचा सत्कार

| कोर्लई | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात मोलाचे योगदान देऊन यशस्वी झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा सत्कार करण्यात आला. जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. जे.टी. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. जे.टी. पाटील, उपाध्यक्ष मुश्ताक घट्टे, संचालक श्रीकांत जावळे, आनत भिडे, हरिश्चंद्र वालेकर, श्रीकांत पाटील, राजेंद्र केतकर, सूर्यकांत सरोदे, गिरीष बिवरे, सुरेखा पाटील, अनघा भिडे, जया रानडे, व्यवस्थापिका अमृता पारसनीस यांसह भागधारक उपस्थित होते.

Exit mobile version