‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

31 मेपर्यंत वाहतुकीस निर्बंध

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड पोलीस यांच्या पत्राच्या अनुषंगाने स्थानिक नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, तसेच अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा (चॅम्पियन चौक) मार्गावर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे.

सदर मार्गावरील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी नियोजित कालावधीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाच्या दिनांकापासून 31 मे 2026 पर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

या काळात पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून, कार्लेखिंड-पिंपळभाट-अलिबाग रिलायन्स बायपास चौक-बायपास रोड-अलिबाग रेवस नाका-बुरूमखान-मानी फाटा-आरसीएफ कंपनी थळ-कनकेश्वर फाटा-चोंढी मांडवा या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. तसेच मांडवा मार्गे येणारी जड वाहने चोंढी-आरसीएफ थळ-मानी फाटा-अलिबाग रेवस नाका-बायपास रोड-रिलायन्स चौक-पिंपळभाट-कार्लेखिंड-पोयनाड या पर्यायी मार्गाने प्रवास करतील. दरम्यान, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, तसेच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

Exit mobile version