मुख्याधिकार्यांचे दंडात्मक कारवाईचे आदेश
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी वस्तू आण्या-नेण्याकरिता 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीचा वापर करु नये, जर कोणी केल्यास त्याचा वर होणार दंडात्मक कारवाई होणार तरी प्लास्टिक पिशवीचा वापर करु नये, असे आवाहन मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाने 23 मार्च 2018 रोजी असाधारण राजपत्र प्रसिद्ध करुन महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक बंदी केलेली आहे. तरी सर्व नागरिक, व्यावसायिक व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा अन्यथा शासन नियमानुसार पुढीलप्रमाणे दंड एवं शिक्षा करण्यात येईल. दंडाची रक्कम पहिला गुन्हा 5000 रुपये/दंड, दुसरा गुन्हा 10,000 रुपये/दंड, तिसरा गुन्हा 25,000 रुपये/दंड तीन महिने कारावास होऊ शकतो.तरी प्लास्टिक वापर बंद करा व पर्यावरणाचा समतोल राखा. तरी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्या वापर करा आणि आपला मुरुड शहर प्लास्टिक पिशव्यामुक्त करूया आणि सुंदर स्वच्छ ठेऊया असे आवाहन पंकज भुसे यांनी केले.