| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या अलिबाग शाखेचे नवीन, अत्याधुनिक आणि ग्राहकस्नेही अशा सुख सागर भवन येथे स्थलांतर करण्यात आले आहे. या नव्या शाखेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन शाखा परिसर अधिक प्रशस्त, सुव्यवस्थित आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. ग्राहकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बँकिंग सेवा देण्याच्या हेतूने हे स्थानांतर करण्यात आले असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यास बँक ऑफ बडोदा मुंबई झोनचे प्रमुख सुनील कुमार शर्मा, नवी मुंबई विभागाचे प्रादेशिक प्रमुख मनिष कुमार सिन्हा, बँकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ग्राहक आणि अलिबाग परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.







