बँक ऑफ इंडिया कर्मचार्‍यांची आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी

। नेरळ । प्रतिनिधी ।
बँक ऑफ इंडिया कर्मचारी यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी येथील आदिवासी मुलांमध्ये दिवाळी सण साजरा केला. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागूचीवाडी तालुका कर्जत येथील 56 शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि फराळ वाटप करून आपली दिवाळी शालेय मुलांसोबत साजरी केली. यावेळी बँक ऑफ इंडिया हेड ऑफिसच्या कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रम प्रसंगी योगेश वनघरे फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष योगेश वनघरे, बँक ऑफ इंडिया हेड ऑफिसचे अजय सावंत, विकास तातळे, विशाल इंगळे, संजय खापरे, राजू नवघरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश पारधी, बबन निरगुडा, ग्रामपंचायत सदस्या जानकी पारधी, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ राम ढोले तसेच शाळा मुख्याध्यापक हरीचंद्र आढारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version