बियर ग्रिल्सच्या हाती बॅट

| लंडन | वृत्तसंस्था |

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मॅन वर्सेस वाइल्ड’नं जगभर प्रसिद्ध झालेला ब्रिटनचा सर्व्हायव्हल एक्सपर्ट ‘बियर ग्रिल्स’ नुकताच क्रिकेटच्या मैदानावर दिसला. लोकांना सर्व्हायव्हल टिप्स देणारा बियर चक्क क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना दिसला.

वास्तविक, बियर ग्रिल्स एका खास उद्देशाने क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. तो ‘रुथ स्ट्रॉस फाऊंडेशन’ला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर उतरला होता. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉस याचे हे फाऊंडेशन आहे. बियर ग्रिल्स जेव्हा मैदानावर आला, तेव्हा तो फलंदाजी करू शकेल याची कोणालाच खात्री नव्हती. मात्र, त्याने शानदार फलंदाजी करत मोठमोठे फटके मारले. तो अँड्य्रू स्ट्रॉससोबत फलंदाजीला आला होता.

अँड्य्रू स्ट्रॉसचे ‘रुथ स्ट्रॉस फाउंडेशन’ फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित रुग्णांना मदत करण्यासाठी काम करते. स्ट्रॉस यांने 2018 मध्ये ही संस्था सुरू केली होती. 2018 मध्ये त्याची पत्नी रुथ हिचा फुफ्फुसाच्या कर्करोगानं मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने या संस्थेची स्थापना केली.

Exit mobile version