| गयाना | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडिजकडून द्विदेशीय मालिकेत सलग दोन सामने गमावणारा हार्दिक पांड्या भारताचा पहिला कर्णधार ठरला. 2016नंतर विंडीजने प्रथमच सलग दोन ट्वेंटी-20त भारताला पराभूत केले. दरम्यान, या पराभवाचे खापर हार्दिक पांड्याने फलंदाजांवर फोडले आहे.
तो म्हणाला की, आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. सातत्याने गडी बाद झाले आणि ही खेळपट्टी संथ होती. आम्ही 170 धावांपर्यंत पोहोचायला हवं होतं. ज्या प्रकारे निकोलस पूरन फलंदाजी करत होता, त्यामुळे आम्हाला फिरकीपटूंचा योग्य वापर करता आला नाही. 2 बाद 2 धावांवरून ज्याप्रकारे त्यांनी फलंदाजी केली, ते अविश्वसनीय होते. सध्याच्या परिस्थितीत सात फलंदाजासह खेळणे गरजेचे होते. पण, 8, 9 व 10व्या क्रमांकाच्या फलंदाजांपर्यंत ताकद वाढवायला हवी. फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळायला हवं.