। लिव्हरपूल । वृत्तसंस्था ।
तारांकित आक्रमणपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने 11 मिनिटांच्या अंतरात साकारलेल्या हॅट्ट्रीकच्या बळावर बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मंगळवारी मध्यरात्री झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्या टप्प्यातील लढतीत त्यांनी साल्सबर्गचा 7-1 असा धुव्वा उडवला. उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बायर्नने साल्सबर्गला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. मंगळवारी मात्र बायर्नने घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना वर्चस्व गाजवले. लेवांडोवस्कीने अनुक्रमे 17, 21 आणि 23व्या मिनिटाला गोल नोंदवले. थॉमस म्युलर 54 आणि 83वे मिनिट, सर्ज गनाब्री 31वे मि. आणि लेरॉय साने 85वे मि. यांनी लेवांडोवस्कीला उत्तम साथ दिली.
उपउपांत्यपूर्व लढतीत इंटर मिलानने 1-0 असे पराभूत केले; परंतु 2-1 अशा एकूण गोलफरकाच्या बळावर लिव्हरपूलने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या टप्प्यातील लढतीत लिव्हरपूलने मोहम्मद सलाह आणि रॉबटरे फर्मिनोच्या गोलमुळे 2-0 असा विजय मिळवला होता. लिव्हरपूलने गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम आठ संघांत स्थान मिळवले.
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न उपांत्यपूर्व फेरीत
