रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) 36 वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहेत. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

रॉजर बिन्नी याआधी बीसीसीआयच्या निवड समितीचा एक भाग होते. तसेच रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून खेळला आहे. स्टुअर्ट बिन्नींच्या निवडीदरम्यान रॉजर बिन्नींवर मुलाला भारतीय संघात स्थान मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

क्रिकेट कारकीर्द
अष्टपैलू रॉजर बिन्नीने 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं 27 कसोटी सामन्यांत 830 धावा केल्या आहेत. तर, 72 एकदिवसीय सामन्यांत 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. कसोटीत 11 तर एकदिवसीय सामन्यात 12 झेल घेतले आहेत. 27 कसोटीमध्ये 47 विकेट्स, तर 72 एकदिवसीय सामन्यांत 77 विकेट्स मिळवल्या आहेत. 1983 रॉजर बिन्नीनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

Exit mobile version