सावधान! पुढिल तीन दिवस धोक्याचे; अनावश्यक प्रवास टाळा

पावसाच्या इशार्‍याने नौका किनार्‍यावर
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील घरगुती गणेशोस्तवास भक्ती आणि श्रद्धापूर्वक प्रारंभ झाला असून, मोठया संख्येने गणेश भक्त मुंबई पुण्यातून परिसरात आलेले आहेत. मात्र पाऊस पडत असल्याने उत्साहाला गालबोट लागत आहे.पुढच्या तीन दिवसात वादळी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिल्याने अनेकांना चिंताग्रस्त झाले आहेत. एकदरा, मुरूड, राजपुरी येथील मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनार्‍यावर आणण्यात आल्या आहेत.या मोसमामध्ये तिसर्‍यांदा मासेमारी ठप्प झाली आहे.

एकदरा आणि मुरूड परिसरातील मच्छिमार गणेश उत्सवासाठी दीड दिवसाचे विसर्जन झाल्या नंतर आधिक प्रमाणात येत असतात. मात्र पाऊस आणि वादळी पावसाच्या शक्यते मुळे मासेमारी सोडून किनार्‍यावर परतलेले शनिवारी दिसून आले.एकदरा येथील नवीन जेटीवर फाटलेल्या मच्छिमारी जाळ्या बाहेर काढून कवळण्यांच खलाशानी सुरू केल्याचे शनिवारी एकदरा जेटीवर दिसत होते.मागील 6 सप्टेंबर रोजी अति मुसळधार पावसामुळे समुद्र खाडीत गोरवानी आल्याने चार नौका वाहून गेल्या होत्या.वादळाच्या शक्यतेमुळे पुन्हा गोरवानी येण्याची भीती एकदरा येथील मच्छिमाराीं व्यक्त केली. यंदा पावसाने मुरूड तालुक्याला संकटाच्या खाईत लोटल्याच्या प्रतिक्रिया आलेल्या गणेश भक्तांनी व्यक्त केल्या. यावर्षी 3600 मिमी पाऊस आतापर्यंत पडला आहे.

परतलेल्या नौका प्लास्टिक ताडपत्रीने शाकरण्यात आलेल्या असून अशा वादळी परिस्थितीत समुद्रात मासेमारीस जाणे जोखमीचे असल्याचे मत शनिवारी अनेक मच्छिमारी बाधवांनी एकदरा जेटीवर व्यक्त केले.त्यामुळे आणखी एक मासेमारी मोसम वाया जाईल अशी माहिती येथे देण्यात आली. गणेशोत्सवात कोळीवड्यांतून मोठा उत्साह असतो. अर्थार्जन अवलंबून असणार्‍या मासेमारीवर अनेक संकटांची मालिका सुरू असल्याने काही भागात निरुत्साह दिसून येत आहे. मासेमारी ठप्प झाल्याने बाहेरून मासळी आयात करावी लागत आहे.त्यामुळे उपलब्ध मासळीचे भाव गगनाला भिडल्याचे मार्केटमध्ये दिसत आहेत. समुद्र देखील खवळला असून समुद्रात दुरदूवर कुठेही नौका दिसत नाही.

गोरवानमुळे मोठे नुकसान

समुद्रात खारे आणि गोडे अचानक मोठ्या प्रमाणात एकत्र आले की,गोरवानी तयार होते.या प्रकारात पाण्याला पीळ येत असतो.पाणी घुसळले जाते,अशा प्रकारात नौका असो की पट्टीचा पोहणारा असला तरी खूप दूरवर वाहत जातो. कोणलाही रोखता येत नाही. एकदरा आणि मुरूड खाडीचा परिसर डोंगरकड्यानी वेढलेला आहे.त्यामुळे पावसात केंव्हाही असा प्रकार होऊ शकतो.त्यामळे डोळ्यात तेल घालुन तातडीने हालचाली कराव्या लागतात अशी माहिती बुजर्ग मच्छिमार मंडळीनी दिली.

मुसळधार पाऊस आणि डोंगर कड्यातून गोडे पाणी प्रचंड वेगाने मुरूड-एकदरा समुद्र खाडीत घुसल्याने पाण्याला तिपटीने वेग आला आणि खाडीत बांधलेल्या चार नौका दोरखंड तोडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.हा अचानक प्रकार झाला त्याला कोळी भाषेत गोरवानी म्हटले जाते.

मनोहर बैले, रायगड मच्छिमार कृती समिती अध्यक्ष



Exit mobile version