सावधान! या दिवसांत समुद्रकिनारी जाणे ठरेल धोक्याचे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच या वर्षी तब्बल 22 दिवस समुद्राला उधाण येणार असल्याची आकडेवारी शासनाने जाहीर केली आहे. यामध्ये 16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वात मोठ्या म्हणजे 4.87 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक-पर्यटकांनी या दिवशी समुद्रावर जाणे शक्यतो टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
समुद्राला उधाण असताना प्रचंड उंच लाटा किनाऱयावर आदळत असतात. साधारणतः साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका संभवू शकतो. याच वेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे असे उधाणाचे दिवस धोकादायक असल्याचा इशारा पालिकेकडून दिला जातो. या वर्षी जून-जुलैमध्ये प्रत्येकी सहा वेळा, तर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाच वेळा समुद्राला उधाण येणार आहे. गेल्या वर्षी एकूण 18 दिवस समुद्राला उधाण होते. या उधाणांच्या दिवशी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी किनाऱ्यावर काळजी घ्यावी, शक्यतो जाणे टाळावे असे आवाहन केले जाते. उधाणांच्या दिवशी सर्व किनाऱयांवर पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात येतो. शिवाय सुरक्षा यंत्रणाही तैनात ठेवण्यात येत असते.

हे दिवस धोक्याचे
जून
दिनांक वेळ लाटांची उंची

 13        11.08      4.56 मीटर
 14        11.56      4.77  मीटर
 15        12.46      4.86 मीटर
 16        13.35      4.87 मीटर
 17        14.25      4.80 मीटर
 18        15.16      4.66 मीटर

जुलै
दिनांक वेळ लाटांची उंची

 13        11.44      4.68 मीटर
 14        12.33      4.82 मीटर
 15        13.22      4.87 मीटर
 16        14.08      4.85 मीटर
 17        14.54      4.73 मीटर
 18        15.38      4.51 मीटर

ऑगस्ट
दिनांक वेळ लाटांची उंची

 11        11.33      4.59 मीटर
 12        12.18      4.77 मीटर
 13        13.00      4.85 मीटर
 14        13.39      4.81 मीटर
 15        14.18      4.66 मीटर

सप्टेंबर
दिनांक वेळ लाटांची उंची

 9         11.16      4.52 मीटर
 10        11.55      4.68 मीटर
 11        12.31      4.73 मीटर
 12        13.05      4.65 मीटर
 13        1.34        4.54 मीटर
Exit mobile version