सावधान! मुरुडमध्ये कोरोनाचा शिरकाव

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुका हा राज्यात प्रथम कोरोनामुक्त होणारा तालुका होता. मात्र आता कोरोनाने पुन्हा एकदा मुरूड तालुक्यात शिरकाव केला असून परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुरुडमध्ये चौथ्या लाटेत हा दुसरा रुग्ण आढळल्याने नागरिकांनी चिंता वाढली आहे. मुरूड तालुक्यात शुक्रवारी पुन्हा एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकही चिंता व्यक्त करत आहेत.

राज्यात महाराष्ट्र दिनापासून कोरोना निर्बंध पुर्णपणे उठविण्यात आले होते. पहिल्या लाटेत शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामध्ये 111 जणांनी जीव गमावला होता. यानंतर दुसर्‍या व तिसर्‍या लाटेत शहरवासीयांनी डॉक्टर व नर्सच्या सहकार्याने कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला. सध्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली असून एक कोराना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्या रुग्णाला मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version