सावधान ! कोरोनाची तिसरी लाट येतेय….

करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टिपेला पोहोचू शकते, आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी मांडला अंदाज

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दुसरील लाट हळूहळू ओसरत आहे. पण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. आता आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी एक अंदाज मांडला आहे.

देशात करोनाची दुसरी लाट मंदावली आहे. पण तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला ( coronavirus india third wave prediction ) गेला आहे. देशातली जनतेने करोनासंबंधी नियमांचे पालन न केल्यास करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत टिपेला पोहोचू शकते. पण दुसऱ्या लाटेत रोज जेवढ्या रुग्णांची नोंद झाली त्या तुलनेत तिसऱ्या लाटेत करोना रुग्णांची संख्या ही निम्मी असण्याची शक्यता आहे, असं करोनासंबंधीच्या सरकारी पॅनेलवरील एका शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. करोना नवीन एखादा घातक वेरियंट आला तर तिसरी लाट वेगाने पसरण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यासाठी मॉडेलमध्ये तीन वर्ग करण्यात आले आहेत. एक आशादायी, मध्यवर्ती आणि निराशादायक, असं मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गेल्या वर्षी गणिताच्या मॉडेल्सचा वापर करून करोना व्हायरस रुग्णांमधील वाढीचा अंदाज वर्तवण्यासाठी पॅनेल स्थापन केले होते. तीन सदस्यांच्या समितीत सहभागी असलेल्या मनिंद्र अग्रवाल यांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रतिकारशक्ती कमी होणं, लसकरणाचा परिणाम आणि अधिक घातक वेरियंट या तीन शंका तिसऱ्या लाटेबाबत समोर आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

ऑगस्टच्या मध्यपर्यंत दुसरी लाट नगण्य होण्याची शक्यता आहे. आणि तिसरी लाट ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान टिपेला पोहोचू शकते. निराशावादी अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत देशात करोनाचे १,५०,००० ते २, ००,००० लाखांदरम्यान रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. ही संख्या दुसरी लाट टिपेला पोहोचली असताना तिच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. मे महिन्याच्या सुरवातीला हॉस्टिल्समध्ये मोठ्या संख्येत रुग्ण दाखल होत होते. रोज हजारो नागरिकांचा करोनाने मृत्यू होत होता. ७ मे रोजी भारतात ४,१४,१८८ इतकी सर्वाधिक एका दिवसांतील रुग्णसंख्य नोंदवली गेली होती.

Exit mobile version