623 रुग्ण कोरोनामुक्त
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज शनिवार दि. 3 जुलै रोजी कोरोनाच्या 518 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 623 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पनवेल शहरात 96, पनवेल ग्रामीणमध्ये 60, अलिबागमध्ये 62, खालापूरमध्ये 29, उरणमध्ये 23, पेणमध्ये 52, महाडमध्ये 41, कर्जतमध्ये 21, रोह्यात 36, मुरुडमध्ये 5, माणगावमध्ये 34, म्हसळ्यात 6, सुधागडमध्ये 16, श्रीवर्धनमध्ये 22, पोलादपूरमध्ये 12 तर तळा तालुक्यर्चीं 3 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 1 लाख 49 हजार 372 झाली आहे. यापैकी 1 लाख 39 हजार 769 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 650 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 953 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.