ओमिक्रॉन पाय पसरु लागलायं

नवी दिल्लीत रुग्णावर उपचार
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात मओमिक्रॉनफचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता रविवारी राजधानी दिल्लीत एका तरुणाला मओमिक्रॉनफचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत आढळून आलेल्या ओमिक्रॉनच्या पहिला रुग्णावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तो काही दिवसांपूर्वी टांझानियातून भारतात आला आहे.
विदेशातून दिल्लीत आलेले एकूण 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
दिल्लीत ओमिक्रॉनचा आढळलेला पहिला रुग्ण हा देशातील ओमिक्रॉनचा 5 वा रुग्ण आहे. देशात सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ऑमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये एक आणि महाराष्ट्रातील डोंबिवलीत एका रुग्णाची नोंद झाली.

Exit mobile version