आरोग्य आणीबाणीसाठी तयार राहा: पंतप्रधानांचे आवाहन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

संपूर्ण जगानं गेल्या वर्षभरापूर्वी कोविडचा भीषण काळ पाहिला. यामध्ये जगभरातील करोडो लोक बाधित झाले होते तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यापार्श्वभूमीवर भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी आपल्याला तयार रहायला हवं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातच्या गांधीनगर इथं आयोजित जी 20च्या परिषदेत ते व्हिडिओ मेसेजद्वारे बोलत होते. भारतातील 2.1 मिलिअन डॉक्टर्स, 3.5 मिलियन नर्सेस, 1.3 मिलियन नर्सेस, 1.3 मिलियन पॅरामेडिक्स, 1.6 मिलियन फार्मासिस्ट तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लाखो लोकांच्यावतीनं पंतप्रधानांनी जी 20 परिषदेतील आरोग्य मंत्र्यांचं स्वागत केलं.

मोदी म्हणाले, महात्मा गांधींनी आरोग्य हा देशासाठी महत्वाचा विषय असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी त्यांनी की टू हेल्थ नावानं एक पुस्तकही लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, निरोगी असणं म्हणजे मन आणि शरीर सुसंवाद आणि समतोल स्थितीत असणे होय, म्हणजे आरोग्य हा जीवनाचा पाया आहे. यावेळी त्यांनी आरोग्यम्‌‍ धनसंपदा या संस्कृत श्लोकचं देखील उल्लेख केला. दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी कोविड 19चं स्मरण करताना म्हटलं की, आरोग्य हे आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी असायला हवं. काळानं आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य शिकवलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं औषधांचा आणि लशींचा पुरवठा किंवा आपल्या लोकांना देशात सुखरुप घेऊन येणं शिकवलं आहे. महामारीच्या काळानं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्यामुळं ग्लोबल हेल्थ सिस्टिमनं लवचिक असणं गरेजचं आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. त्यामुळं भविष्यातील आरोग्य आणीबाणीला प्रिव्हेंट, प्रिपेअर आणि रिस्पॉन्डसाठी तयार असलं पाहिजे असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं.

Exit mobile version