एक्स्प्रेस टोल वाढल्याने ताम्हाणीमार्गे हजारो पर्यटक कोकणात
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
एप्रिलपासून एक्सप्रेसचा टोल वाढल्याने हजारो पर्यटक ताम्हाणी मार्गे कोकणात उतरले. ताम्हाणी मार्ग संपूर्ण रास्ता नव्याने बनवण्यात आल्याने रस्ता चकाचक झाला असून, कोणताही टोल नसल्याने पुणे परिसरातील हजारो पर्यटक सलग सुटी असल्याने कोकणात येण्यासाठी ताम्हाणी मार्गाचा वापर करत आहेत. आज ताम्हणीतील सर्व हॉटेल्स सकाळपासून फुल्ल होती. पर्यटक रस्त्यावर गाड्या लावून हॉटेलात नाश्त्याचा आनंद घेत होते.
मुरुडमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले. जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यात स्वच्छ समुद्रकिनारा व किनार्यावरील घोडागाडीची रपेट, निळ्याशार समुद्राच्या लाटांमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील पर्यटक दाखल झाले आहेत.