| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयामध्ये 70 टक्क्याहून अधिक पदे रिक्त असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. येथे शिक्षण घेण्यार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हा चिंतेचा विषय बनला आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच अधिष्ठता यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘ढोल बजाओ, आरोग्य यंत्रणा सुधारो’ आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा, मशनरी तसेच वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांची पदे भरलेली नाहीत. याबाबत वैभव नाईक यांनी आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले.







