आयएफटी जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबरपदी निवड
| उरण | वार्ताहर |
जगातील 160 देश सभासद असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (आयएफटी) लंडन या बहुराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन 12 ते 19 ऑक्टोबर रोजी मोरोको येथे सुरु आहे. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी या बहुराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक कार्यकारिणीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारत देशातून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची एक्सिक्युटीव्ह मेंबरपदी निवड करण्यात आली. जिथे भारतीयांना प्रतिनिधीत्व मिळत नव्हते तिथे आपल्या नेतृत्व कौशल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी भारतीयांचा झेंडा रोवला. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध कामगार संघटनाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आदी विविध क्षेत्रातून विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.