पेण येथे मारहाण

। पेण । वार्ताहर ।
पेण येथे कुरिअर च्या दुकानात काम करणार्‍या फिर्यादीवर एका अज्ञात इसमाने आरोप करून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. पेण येथील सोहम सर्विस कुरीअर एस.आर.कॉम्प्लेक्स पेण, गाळा क्र.04 येथे दि. 13 नोव्हेंबर रोजी पोयनाड येथील देहेन गावात राहणारे फिर्यादी हे काम करीत असलेल्या गाळया समोर उभे असताना अज्ञात आरोपीत हा स्कुटीवरून समोर येऊन फिर्यादी यांच्यावर बँकेचे लेटर गहाळ केल्याचा आरोप करून, त्यांना लाकडी दांडक्याने दुखापत केली. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोना/02 पाटील हे करीत आहे.

Exit mobile version