हातखर्चासाठी पैसे मागणार्‍या वडिलांना मारहाण

। पनवेल । वार्ताहर ।
होमगार्डमध्ये कामाला असलेल्या एका तरुणाने हातखर्चासाठी पैसे मागणाऱया आपल्या वडीलांच्या पोटात लाथा मारुन त्यांना गंभीर दुखापत केल्याचा प्रकार कोपरखैरणेत उघडकीस आला आहे. मयुर सुनिल बोडके (27) असे वडिलांना मारहाण करणाऱया मुलाचे नाव असून कोपरखैरणे पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या वडीलांचे नाव सुनिल बोडके (50) असे असून ते कोपरखैरणे सेक्टर-18 मध्ये रहाण्यास आहेत. त्यांचा मुलगा मयुर बोडके (27) हा त्याच्या पत्नीसह रहाण्यास असून तो होमगार्डमध्ये कामाला आहे. सुनिल बोडके हे काही वर्षापुर्वी माथाडी कामगार म्हणून निवृत्त झाल्यानंतर सध्या ते घरीच आहेत. सुनिल बोडके यांचे तीन रुम भाड्याने देण्यात आले असून त्याचे घरभाडे मयुर बोडके घेतो. मात्र त्यातील काहीच रक्कम तो वडिलांना हात खर्चासाठी देत नव्हता. त्यामुळे बोडके यांचे आपल्या मुलगा मयुर बोडके याच्यासोबत नेहमी वाद होत होते. मयुर बोडके याला दारु पिण्याचे व्यसन असून दारु पिऊन आल्यानंतर तो नेमही आपल्या वडीलांसोबत वाद घालुन त्यांच्यासोबत भांडण काढत होता.
5 ऑक्टोबर रोजी दुपारी सुनिल बोडके हे आपल्या घरात जेवण करत बसले असताना, मयुर बोडके याने वडीलांना शिवीगाळ करुन त्यांना पैसे कशाला पाहिजेत अशी विचारणा करुन त्यांच्या पोटात उजव्या बाजुला जोर-जोरात लाथा मारल्या. त्यानंतर त्यांना लाथ मारुन घराच्या बाहेर ढकलुन दिले.

Exit mobile version