| रायगड | खास प्रतिनिधी |
उत्तर प्रदेशातून कामानिमीत्त आलेल्या ताैफीक अहमद याला आंतकवादी असल्याच्या संशयावरुन काही तरुणांनी मारहाण केली. त्यानंतर पाेलिसांनी याची शहनिशा केली असता. ताे कामानिमित्त तेथे वर्षभरापासून असल्याचे समाेर आले. त्यानंतर पाेलिसांनी ताैफिकला मारहाण करणाऱ्यांविराेधात दिघी सागरी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना 5 ऑगस्ट राेजी असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
त्यानंतर ताैफिकचा एक व्हिडीओ साेशल मिडीवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ताे आत्महत्या करणार असल्याचे सांगत आहे. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील साेशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पाेलिस त्याला त्रास देत असल्याचेही त्यांनी त्या व्हिडीओमध्ये म्हटल्याचे दिसून येते. सध्या ताैफिक काेठे आहे याची पाेलिस माहिती घेत असल्याचे अपर पाेलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.