क्षुल्लक कारणावरुन मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायतीमधील पाली बौद्धवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पताका लावण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाणीची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यात चार महिलांचा समावेश आहे.
कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायत हद्दीमधील पाली गावातील बौद्धवाडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंतीनिमित्त तेथील समाज बांधव तयारी करीत होते. त्यानिमित्ताने मध्यरात्री बाराच्या सुमारास पताका लावल्या जात असताना लाईटच्या खांबावर चढून पताका लावत होता. त्यावेळी पंकज खंडागळे हे तेथे आले आणि त्यांनी हृतिक खंडागळे यांना तारेला पताका लाव अशी मस्करी केली. याचा राग अनावर झाल्याने खांबावरून खाली उतरलेल्या हृतिक यांनी पंकज खंडागळे यांना शिवीगाळ करून तेथून निघून जाण्यास सांगितले. काही वेळाने पंकज खंडागळे यांच्या घरासमोर हृतिक संजय खंडागळे, संगीता संजय खंडागळे, सानिका संजय खंडागळे, भालचंद्र बाळू खंडागळे, आदेश संतोष खंडागळे, संदेश संतोष खंडागळे, साहिल संतोष खंडागळे, आशा भालचंद्र खंडागळे, स्नेहा संजय खंडागळे हे सर्व एकत्र जमले. त्यांनी पंकज खंडागळे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शेवटी दमदाटी केली.
याबाबत करुणा किरण खंडागळे यांनी तक्रार दिल्यानंतर कर्जत पोलीस गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अंमलदार लावरे हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version