| वेणगाव | वार्ताहर |
इंस्टाग्रामवर (दि.9) रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व आपमानकारक मजकूर, पोस्ट लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणार्या व धार्मिक भावना दुखावणार्या इसमाविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा प्रकार माहीत झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. सदरची फिर्याद धर्मेंद्र मोरे यांनी फिर्यादी म्हणून दाखल केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी घडलले फेसबुक प्रकरण ताजं असतानाच सदरचा प्रकार घडल्यामुळे जन सामन्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रचे सायबर सेलचं अपयश चर्चेत आले आहे. सदर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी धर्मेंद्र मोरे, राहुल डाळींबकर, अॅड. कैलास मोरे, सुनील गायकवाड, कृष्णा जाधव, लोकेश यादव, मनोज गायकवाड, शैलेश खोब्रागडे, सुनील सोनावणे, प्रकाश जाधव, विजय जाधव, संजय ढोले, केतन गायकवाड, मोहन जाधव, ललित हिरे, संतोष जाधव, प्रदीप गायकवाड उपस्थित होते.