पेण । वार्ताहर ।
जुन्या वादातून पेण तालुक्यातील अंतोरे येथे एकाला दांडक्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. पेण पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी रा.अंतोरे लक्ष्मीनगर ता.पेण हे त्यांच्या वडिलांबरोबर घरगुती चर्चा करत असताना आरोपी रा.अंतोरे लक्ष्मीनगर ता.पेण याने पूर्वीच्या वादावरून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली व लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या हाताला उपट मारून दुखापत केली. तसेच लाकडी दांडक्याने समोरील दरवाजाच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले.