| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत नवीन पोसरी-मोहोपाडा येथील अनिता अनंता खारकर (48, रा. नवीन पोसरी मोहोपाडा) यांच्या घराच्या अंगणाचे वहिवाटीच्या जुन्या वादावरून कुरापत काढून कुत्री पिसाळलेली आहेत बोलल्याचा गैरसमज करून घेऊन नितेश पाटील, सुनंदा रघुनाथ पाटील, रघुनाथ शंकर पाटील या तिघा जणांनी संगनमत करुन अनिता अनंता खारकर फिर्यादी व त्यांचा मुलगा अलंकार व दिपेश यांना शिविगाळी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, सुनंदा पाटील यांनी अनिता खारकर यांची साडी ओढून व सोन्याची पोत तोडून नुकसान केले तसेच, विरोधक नितेश पाटील यांनी अनिता खारकर यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेऊन दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात परस्परांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन चौरे अधिक तपास करीत आहेत.