| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी पनवेल न्यायालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या प्लॉटमधील झाडीला अचानकपणे गुरुवारी सकाळी आग लागली व आग वाढत गेल्याने तातडीने पनवेल महानगरपालिकेचे दोन अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी येऊन त्यांनी आग विझवली आहे. तर, दुसर्या घटनेत तळोजा औद्योगिक क्षेत्रात पेंधर गावाकडे जाणार्या रस्त्यावर डिव्हायडवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून, यात सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.