बीड पुन्हा एकदा हादरले

| बीड | प्रतिनिधी।

बीड शहर पुन्हा एकदा धक्कादायक हत्याकांडाने हादरले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश नवनाथ दळवी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण होऊन संतापाची लाट पसरली आहे. या घटनेने पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेश दळवी याचे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो सध्या सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Exit mobile version