राज ठाकरें विरोधात बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जरी केलं आहे. सांगली, शिराळा नंतर आता बीड जिल्ह्यातही अजामीनपात्र वॉरंट समोर आलं आहे. मराठी पाट्यांसंदर्भात झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट जारी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे.

परळी कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट या प्रकरणात आता गृहखाते कारवाई करण्याच्या बेतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गृहखाते कारवाई करेल अशी माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी नुकताचं सांगलीतील शिराळा येथे राज ठाकरेंविरोधात एक आजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्यानंतर आता पाठोपाठ परळी येथेही असं वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. याविषयी एक पत्र मुबंई पोलिसांना प्राप्त झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई पोलिसही कारवाई करण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार आणि मनसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असल्याचे चित्र आहे. आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटणार का अशी चर्चा सुरु आहे. सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. एका जुन्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याचं सांगितलं जात आहे.

Exit mobile version