एम्बायो कंपनीकडून महाड नगरपरिषदेला घंटागाडी सुपूर्द



महाड । प्रतिनिधी ।
महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष स्नेहल माणिक जगताप यांनी घंटागाडी मिळणे बाबतचा प्रस्ताव एम्बायो कंपनीकडे केला होता. त्याची दखल घेत सीएसआर फंडातून नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत महाड नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात आली.

यावेळी कंपनीचे प्लॅन्ट मॅनेजर रावसाहेब गीते, सिनियर मॅनेजर किशोर चौधरी, नगरसेवक सुनील कविस्कर, संदीप जाधव, सुनील अग्रवाल, दीपक सावंत यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले. यावेळी रावसाहेब गीते यांनी सदर घंटागाडीची चावी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्याकडे सुपूर्द केली.

या कार्यक्रमाला उपस्थित उपनगराध्यक्ष सपना बुटाला, बांधकाम सभापती प्रमोद महाडिक, आरोग्य सभापती दादा राक्षे, पाणी पुरवठा सभापती मयुरी शेडगे, चैतन्य पोटफोडे, सलील मेहता, मुख्याधिकारी जीवन पाटील, परेश साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version