बेन स्टोक्सला गंभीर दुखापत

| लंडन | वृत्तसंस्था |

इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऑली पोप हा घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. ‌‘दी हंड्रेड’ या लीग दरम्यान बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे बेन स्टोक्सला आगामी मालिकेतून माघार घ्यावी लागत आहे. दी हंड्रेड लीगमध्ये नॉर्थन सुपरचार्जर्सकडून खेळताना रविवारी त्याला ही दुखापत झाली. मंगळवारी लीड्समध्ये केलेल्या स्कॅनमध्ये त्याची दुखापत गंभीर असल्याचे जाणवल्यामुळे त्याला 21 ऑगस्टपासून एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. संघात अतिरिक्त बदल केला जाणार नाही, असेही निवेदनात म्हटले गेले आहे.

Exit mobile version