लंडनमध्ये बंगाली भाषेतील साईनबोर्ड्स

। कोलकाता । वृत्तसंस्था ।
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी ट्विट करत बंगाली संस्कृतीबाबत आपला आनंद व्यक्त केला आहे. महा आमच्या संस्कृती आणि वारशाचा विजयफ असल्याचं म्हणत त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. लंडनमधील ट्यूब रेल्वे व्हाईटचॅपेल स्टेशनवर साईनबोर्डसाठी बंगाली भाषा देखील वापरली गेली आहे. त्याबाबत त्यांनी हा आनंद व्यक्त केला आहे. व्हाईटचॅपल स्टेशन हे लंडनमधील व्हाईटचॅपल स्ट्रीट मार्केटच्या मागे आणि रॉयल लंडन हॉस्पिटलच्या समोर आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटलंय की, लंडन ट्यूब रेलने व्हाईटचॅपेल स्टेशनवर बंगाली ही संकेतांसाठीची भाषा म्हणून स्वीकारण्यात आली आहे. हे 1000 वर्षे जुन्या बंगाली भाषेचे जागतिक महत्त्व आणि सामर्थ्य दर्शवत आहे. हे पाहून अभिमान वाटतो आहे. त्या पुढे म्हणाल्या की, बंगाली संस्कृतीतील लोकांनी समान सांस्कृतिक दिशांमध्ये एकत्र येऊन काम केलं पाहिजे बांगलादेशचे राज्यमंत्री जुनैद अहमद यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये लंडनमधील व्हाईटचॅपेल रोड आणि डर्वर्ड स्ट्रीटवर असलेल्या लंडन अंडरग्राउंड आणि लंडन ओव्हरग्राउंड स्टेशनचे नाव आता इंग्रजीव्यतिरिक्त बांगला भाषेत देखील लिहलेलं आहे.

Exit mobile version