बेंगळुरूला प्ले-ऑफची आशा

। बेंगळुरू । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 मधील 30 वा सामना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला गेला. जो सनरायझर्स हैदराबादने जिंकला. आरसीबीचा या हंगामातला हा सहावा पराभव आहे. त्यामुळे ज्यांच्या चाहत्यांना असे वाटते की, आता आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली. पण आरसीबीच्या चाहत्यांनो आशा सोडू नका. आरसीबी अजून पण प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.

आता प्रश्‍न असा आहे की, जर आरसीबी संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर काय करावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आरसीबीला त्यांचे उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि सध्या टॉप 4 मध्ये असलेल्या संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. तरच आरसीबीसाठी काही समीकरण तयार होऊ शकेल. लेऑफमध्ये जाण्यासाठी कोणत्याही संघाचे किमान 16 गुण असणे आवश्यक आहे. आणि मोठी गोष्ट म्हणजे 16 गुण मिळवूनही संघ प्ले ऑफमध्ये जाईल हे निश्‍चित नाही. यासाठी त्याचा नेट रनरेटही चांगला असणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version