सौरभ नाझरेंच्या छायाचित्राला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

फोटो सर्कल ठाणे आयोजित अविष्कार फोटो स्पर्धेत मुरूडचे सौरभ नाझरे यांना वेडिंग विभागात राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. स्पर्धेत हजारो फोटो सहभागी झाले होते. त्यातून सौरभचा लग्नातील विशेष फोटो निवडण्यात आला. त्याला 10 हजारांचे रोख पारितोषिक व सन्मानपात्र, चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सहा विविध विभागात झाली. यावेळी सर्व विजेत्यांना 1 लाख 95 हजारांची रोख परितोषिके देण्यात येणार आहेत. 24 ते 26 नोव्हेंबर 2023 रोजी ठाण्यात भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार असून, त्यावेळी परिपोषक वितरण होणार आहे.

सौरभ नाझरे गेली 12 वर्षे व्यावसायिक फोटोग्राफी करत आहे. वृत्तपत्रातदेखील काम करत असल्याने निसर्गचित्रांसोबत लग्नसमारंभात विशेष फोटोग्राफीत प्राविण्य मिळवल्याने नाविन्यपूर्ण फोटो शूटसाठी प्रसिद्ध आहे. रायगड फोटोग्राफी असोसिएशनच्या 2023 फोटो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. वडील सुधीर नाझरे यांचा पारंपरिक छायाचित्रणाचा व्यवसाय असल्याने वडिलांचे मार्गदर्शन घेऊन फोटोग्राफी क्षेत्रात त्याने उंच भरारी घेतली आहे. या स्पर्धेचे परीक्षण जागतिक पातळीचे परीक्षक शरमली दास (कलकत्ता), तृप्ती रॉय (गोवा), गुरुदास दुवा (इंदोर), रूपक डे (लखनौ), शिरीष साने (मुंबई), शशांक रणजित (मुंबई) यांनी केले.

Exit mobile version