महिलेवर गुन्हा दाखल
| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
लाडकी बहिणसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देतो असे सांगत निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना म्हस्के असे या महिलेचे नाव असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हातमाळीमधील ही रहिवासी आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार महिलांसह गरीब महिलांकडून पैसे उकळत लूट केल्याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने महिलांसाठी काढलेल्या लाडकी बहिण योजनेसह राजीव गांधी निराधार, श्रावणबाळ अशा सरकारी योजनांचा लाभ मंजूर करून देते या महिलेने महिलांचे पैसे उकळत फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार महिलांनी छत्रपती संभाजीनगरचे तहसिलदार रमेश मुणलोड यांनी महिलांचा जबाब घेत पैसे घेण्यााऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.