। पनवेल । वार्ताहर ।
नावाडे कॉलनी येथील रहिवासी भगवान मारुती आवळे (38) हे कामावरून घरी परत आलेच नाही. त्यामुळे ते हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भगवान आवळे यांची उंची 5 फुट 2 इंच, मध्यम बांधा, रंग सावळा, केस काळे सफेद, नाक बसके, चेहरा गोल, नाकास उजव्या बाजूस तीळ आहे. अंगात आकाशी रंगाचा फुल शर्ट व चॉकलेटी रंगाची जिन्स पॅन्ट, पायात काळ्या व लाल रंगाची चप्पल घातलेली आहे. सोबत मोबाईल फोन आहे. त्यांना मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. त्यांच्याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार गणपत पवार यांच्याशी संपर्क साधावा.