आ. जयंत पाटील यांचे गडचिरोलीत जोरदार स्वागत

। गडचिरोली । विशेष प्रतिनिधी ।
शेकाप मध्यवर्ती समितीची दोन दिवसीय बैठक गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने सरचिटणीस आ. जयंत पाटील हे शुक्रवारी गडचिरोलीत दाखल झाले. जयंत पाटील यांचे आमगन झाल्यावर त्यांचे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी स्वतः उपस्थित राहून प्रशासनातर्फे स्वागत केले.

यावेळी राजिपच्या माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजेंद्र कोरडे, ज्येष्ठ नेते प्रा. एस.व्ही. जाधव, जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख जयश्री वेलदा यांच्यासह जिल्हा चिटणीस मंडळ, विविध तालुक्यांतील पदाधिकारी, शेतकरी, मजूर संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जयंत पाटील यांनी आरमोडी तालुक्यातील काटली जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली. या शाळेतील विद्यार्थी अत्यंत हुशार असून, त्यांचे इंग्रजी उत्तम असल्याचे कौतुक जयंत पाटील यांनी केले. आ. पाटील यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली.

गडचिरोलीत बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे 26, 27 नोव्हेंबरला मध्यवर्ती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आ. जयंत पाटील यांच्यासह आ. बाळाराम पाटील, श्यामसुंदर शिंदे, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. संपतबापू पाटील, धैर्यशील पाटील, पंडित पाटील, प्रा. एस.व्ही. जाधव, कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांच्यासह राज्यभरातील दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version