पनवेलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का

| पनवेल | वार्ताहर|

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि पारगाव दापोली येथील कार्यकर्ते प्रकाश जीतेकर यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश कडू, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राम भोईर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संतोष पाटील उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version